साकत येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला कोठडी


जामखेड प्रतिनिधी 

साकत येथील एका अल्पवयीन मुलीवर गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपी मच्छिंद्र रोहीदास गवळी वय १८ रा, साकत याने अत्याचार केला. सदर अल्पवयीन मुलगी साडेपाच महीन्यांची गरोदर असल्याचे लक्षात आल्याने पिडीत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर संबधित आरोपीविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची दि. १६ पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

साकत येथे राहत असलेल्या या अल्पवयीन मुलीने भितीपोटी हा प्रकार भीतीपोटी कोणाला सांगितले नाही. साडेपाच महिन्यानंतर सदर मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर तिच्या आईने तिला बीड येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केली असता ती साडेपाच महिन्यांची गरोदर असल्याची माहिती बीड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी दि. ११ रोजी सदर अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget