Breaking News

ग्रामसुरक्षा दलाने गावात गस्त वाढवावी-पो.नि.बल्लाळ


बीड (प्रतिनिधी)- यावर्षी चा दुष्काळ इतर दुष्काळा पेक्षा जास्त तीव्र यासाठी आहे की गेल्या वर्षी बोन्ड अळीने अवघे पीक खाऊन शेतकर्‍यांना कफाफल्लक केले आणि आता यावर्षी पुन्हा ही परिस्थिती|
काही समाजकंटक आशा परिस्थिती चा विपरीत फायदा घेऊ पाहत आहे. ग्रामीण भागात असुरक्षित घरे हेरून चोरी सारखे प्रकार घडत आहे. काल गेवराई तालुक्यात असाच दरोडा पडला.पोलिसांची संख्या कमी असल्याने प्रत्येक गावात गस्त किंवा पोलीस पुरवल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्राम सुरक्षा दला मार्फत गस्त होणं आता अत्यंत आवश्यक आहे.

याचे नियोजन व्हावे यासाठी मा पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतून ग्रामसुरक्षा दलाची पोलीस ठाणे बीड ग्रामीण यर्थे आज सकाळी ०८:३० वाजता बैठक आयोजित केली आहें. यात मुलांना ओळखपत्रे आणि पोलीस शिटीचे आणि काठीचे वाटप केले जाणार आहे. तसेच कशा प्रकारे रात्र गस्त करावी याच्या सूचना देण्यात येणार आहे. त्याच बरोबरीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे. त्याचप्रमाणे याच कार्यक्रम मध्ये गणेश उत्सव मध्ये उतकृष्ट कामगिरी करणारे मंडळाची निवड होऊन त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर खिरडकर हे मार्गदर्शक म्हणून हजर राहणार आहे.