Breaking News

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वितीने गणेश मंडळांना बक्षीस वितरण संपन्न


बीड (प्रतिनिधी)- बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे वतीने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात उत्कृष्ठ गणेश मंडळास बक्षीस वितरण सोहळा पार पडला. प्रदूषण मुक्त, डीजे मुक्त, गुलाल मुक्त गणेश उत्सव चा नारा ग्रामीण पोलीस ठाण्याने दिला होता त्यास ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यातूनच चांगल्यात चांगले काम करणारे, समाज उपयोगी उपक्रम राबवणारे गणेश मंडळे बक्षीस साठी निवडण्यात आली. क्र ०१ चे बक्षीस बाल गणेश मंडळ, चरहाटा आणि शिवशक्ती गणेश मंडळ, कामखेडा याना मानचिन्ह आणि प्रत्येकी ५००० रु इतके विभागून देण्यात आले. तात्यासाहेब हुले पाटील, हुले कन्स्ट्रक्शन कंपनीकडून हे जाहीर झाले होते. तर दुसरे बक्षीस मोरया गणेश मंडळ, मालापुरी आणि साक्षातमाता गणेश मंडळ, साक्षलपिंप्री यांना देण्यात आले. मानचिन्ह आणि प्रत्येकी ३५०० रु असे बक्षीस दिले. दुसरे बक्षीस संतोष सोनी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष यांनी प्रायोजित केले होतें. तर तिसरे बक्षीस मानचिन्ह आणि प्रत्येकी २५०० हे शिवराजे गणेश मंडळ, मुर्षदपूर आणि सार्वजनिक गणेश मंडळ मंजिरी हवेली याना विभागून देण्यात आले. तिसरे बक्षीस नितीन कोटेचा, उद्योगपती, बीड यांनी दिले होते.