Breaking News

चापडगाव विद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे


शेवगाव श. प्रतिनिधी : 

शहरातील चापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन सप्ताहानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक व अध्यक्ष सूचना गरड दिगंबर यांनी केली. अध्यक्षस्थानी विदयालयाचे उपमुख्याध्यापक अशोक निकाळजे होते. यावेळी आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. भूकंप, माळीण गावची दुर्घटना, निसर्गातील होणाऱ्या हालचाली, अतिवृष्टीमुळे येणारा महापूर, विजा कोसळणे, ज्वालामुखी जंगलात अचानक आग लागणे, पर्यावरणाचा ढासळलेला समतोल, दहशतवाद, दंगल, बॉम्ब स्फोट, अपघात, साप चावणे, पिसाळलेला कुत्रा चावणे, जमिनीचे भुखलन, चक्रीवादळ, अशा मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित संकटामध्ये कशी काळजी घ्यावी, याविषयी माहिती देण्यात आली. प्राचार्य निवृत्ती भांगरे, पर्यवेक्षक शेषराव तहकिक, विनायक झिरपे, राम काटे, रावसाहेब पवार, अनिल ढवळे, भाऊसाहेब शिंदे, अंजली चिंतामण आदी उपस्थित होते.