Breaking News

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रामपाल दोषी


चंदीगड : हिसारमधील न्यायालयाने स्वयंघोषित संत रामपाल याला हत्येच्या दोन प्रकरणात दोषी ठरवले आहे. याप्रकरणी न्यायालय पुढील आठवड्यात शिक्षा सुनावणीर आहे. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हिसारमध्ये चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रामपालच्या सतलोक आश्रमात 18 नोव्हेंबर 2014 रोजी रामपालच्या एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. ही महिला रामपालची भक्त होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणीदेखील रामपालविरोधात सुरू असलेल्या इतर खटल्यांच्या सुनावणीसोबत घेण्यात आली. तर दुसरं प्रकरण 19 नोव्हेंबर 2014 चं आहे. त्यावेळी रामपालचे भक्त आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली. यावेळी हिंसाचारदेखील झाला होता. त्यात 4 महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणांमुळे रामपालच्या अडचणी वाढल्या. 

आता या दोन्ही हत्या प्रकरणांमध्ये रामपाल दोषी आढळला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये रामपाल दोषी आढळला आहे. त्याला पुढील आठवड्यात शिक्षा सुनावली जाणार आहे. रामपालवर असलेल्या हत्येच्या आरोपांवर 24 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. परंतु, यापूर्वी रामरहिम प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान झालेला हिंसाचार लक्षात घेता रामपालच्या प्रकरणाची सुनावणी टाळण्यात आली. त्यानंतर आज, गुरुवारी या प्रकरणावर सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालय परिसर आणि शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या संपूर्ण परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. दरम्यान रामपालवरील देशद्रोहाच्या आरोपावर 19 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.