Breaking News

इंधनाच्या दरात कपात हे निवडणुकीचे ‘लॉलीपॉप’; काँग्रेसची मोदी सरकारवर टीकानवी दिल्ली : इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार्‍या 5 राज्यातील मतदारांसाठी निवडणुकीचे लॉलीपॉप आहे. इंधनाच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने मोदी सरकारचे ढोंग उघडे पडले आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसने सरकारवर केली. सतत वाढणार्‍या पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवरुन काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला. 

काँग्रेसचे नेते पवन खेरा म्हणाले की, नुकताच झालेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ हा सरकारचा बनावटपणा दाखविते. निर्लज्जपणे कमी केलेल्या उत्पादन शुल्काचे श्रेय सरकार घेतले. त्यानंतर तेल कंपन्यांनी मागील दराने इंधनाचे दर वाढविले आहेत. गेल्या दोन दिवसात दिल्लीत पेट्रोलच्या किंमती 32 पैशांनी तर डिझेलच्या किंमती 58 पैशांनी वाढल्याचे खेरा यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये निवडणुका पार पडत असताना 17 दिवस इंधनाच्या किंमती बदलल्या नव्हत्या, याची खेरा यांनी आठवण करुन दिली. इंधनाच्या किंमती या खरोखर अनियंत्रित असतात का, याचे आश्‍चर्य वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल व डिझेलच्या दरात 2.5 रुपये प्रतिलिटर कपात केली होती.