Breaking News

साडेचार कोटींचे बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणी; वणीच्या शरदरावजी पवार पणसंस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल


दिंडोरी : तालुक्यातील वणी येथील शरदरावजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे साडेचार कोटीच्या बेकायदेशीर कर्जवाटप केल्याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात संचालक मंडळ कर्मचारी यांचेवर गुन्हा दाखल झाला असून याप्रकाराने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि वणी येथिल शरदरावजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालंकांवर लेखा परिक्षणा दरम्यान ठपका ठेवण्यात आला आहे फिर्यादी संतोष सदाशिव वाघचैरे हे महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाचे वर्ग 1चे अधिकारी असुन त्यांनी सदर संस्थेचे दि.1 एप्रील 2009 ते दि.31मार्च 2011कालावधीचे फेर लेखापरिक्षण केले असुन या लेखापरिक्षणात या संस्थेत चार कोटी पंच्चावन्न लाख रकमेचे बेकायदेशीर कर्ज वाटप झाल्याचे अपराधीक कृत्य केले असल्याचे निदर्शनास आले याबाबत शासना कडे कायदेशीर अहवाल सादर केला असुन या संस्थेतील बेकायदेशिर कर्ज वाटपास जबाबदार असलेल्या व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल करण्याची परवानगी घेतली असुन त्यानुसार फिर्याद दाखल केली आहे त्या अहवालातील तपशिला प्रमाणे व फिर्यादी प्रमाणे संस्थेचे सभासद ठेविदार व जनतेची आरोपीतांनी संस्थेची रक्कम अपहारीत करून अफरातफर करून बेकायदेशिर कृत्य करून खोटे दस्तााऐवज, खोटे हिशोबपत्रक तयार करून संगनमताने संस्थेची फसवणुक करून सभासद ठेवीदार यांचया विश्‍वासघात केला आहे संस्थेचे संचालंका मध्ये एकाच कुटुबांतील जास्त सदस्य आहेत तसेच यातील लेखापरिक्षक बिपीन जैन यांनी 2008ते 2009 या काळात लेखा परिक्षण केलेले आहे त्याच्यावर असलेली शासकिय जबाबदारी टाळत त्यांनी बेकायदेशिर कृत्य केलेल्या संस्थेची परिक्षणाचा खोटा अहवाल तयार केला व संस्थेचे आर्थिक चित्र चांगले असल्याचे खोटे चित्र तयार करून सभासद ठेवीदारांचे व जनतेची फसवनुक केली आहे . 
याबाबत सहकारी संस्था वर्ग -1 नंदुरबार विशेष लेखापरिक्षक संतोष सदाशिव वाघचैरे यांनी वणी पोलीस ठाण्यात अठरा जणा विरोधात फिर्याद दाखल केली असुन त्यानुसार वणी पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या संचालक व कर्मचारी यांच्या विरोधात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात संस्थेचे चंद्रकांत मागीलाल समदडीया, मोतीराम पांडुरंग सोमवंशी, कल्पना भरतकुमार जन्नाणी, निवृत्ती सिताराम घुले, राजेंद्र परशराम ढोकरे ,संतोषकुमार देवीचंद पगारीया, शरद शंकर वायकंडे, सलिमभाई इस्माईलभाई शेख, सतिष शांतीलील पलोड, मनोहर बळवंत गांगुर्डे, बिपीन जैन (सनदी लेंखापाल).बी एन भदाणे, सरशाद सलिम शेख, जयंतीलाल मोहनलाल समदडीया, महेश शोभाचंद बोरा, पौर्णिमा चंद्रकांत समदडीया, तुषार जिवनलाल समदडीया, प्रकाश मांगीलाल समदडीया यांचे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे .पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी करत आहे.