Breaking News

महिलांनी स्वकर्तृत्वाने सन्मान मिळवावा : अॅड. नाईक


जामखेड प्रतिनिधी 

स्वकर्तृत्वाने आदर्श निर्माण केलेल्या अहिल्यादेवी होळकर या स्त्री शक्तीची खरी ताकद आहेत. या आदर्शाचा जागर करून महिलांनी स्वकर्तृत्वाने सन्मान मिळवावा, असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. माधवी नाईक यांनी चौडी येथे बोलतांना केले. 
नवरात्रोत्सवोत नऊ दिवस राज्यभर चालणाऱ्या या जागर यात्रेची दुसरी माळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चोंडी (ता. जामखेड ) येथे गुंफण्यात आली. यावेळी भाजपा महिला आघाडीच्यावतीने जागर आदिशक्तीचा, सन्मान कर्तृत्वाचा , स्वावलंबी आणि व्यावसायिक भगिनींचा या कार्यक्रमाचे ११ रोजी चौंडी येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अॅड माधवी नाईक बोलत होत्या. त्या म्हणाल्या, नवरात्र उत्सवामध्ये साडेतीन शक्ती पिठातील देवींचा जागर करत असताना समाजाला प्रेरणा व शक्ती देणार्‍या श्रध्दास्थानांचाही गजर व्हावा, या उद्देशाने भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्यावतीने राज्यभर स्त्री सन्मान व जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, सभापती सुभाष आव्हाड, पं. स. सदस्य भगवान मूरूमकर, तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, आ. मोनिका राजळे, जि. प. सदस्या प्रतिभा पाचपुते, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस मनिषा सोनमाळी, अर्चना डोनकर, उमा खापरे, सविता कुलकर्णी, सुनिता भांगरे, संजीवनी सिसोदिया, ममता पिपाडा, अश्विनी थोरात, वैशाली थोरात, शिल्पा गणपते, दिपाली गर्जे, विद्या मोहळकर, वैशाली शिंदे, वनिता कानडे, डाॅ. जयश्री मुंडे, जामखेड पंचायत समितीच्या उपसभापती राजश्री मोरे, गितांजली काळे, सुवर्णा पाचपुते आदींसह आशासेविका जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

यावेळी आ. मोनिका राजळे, सुवर्णा पाचपुते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, महिला प्रदेशच्या उमा खापरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मनिषा सोनमाळी यांनी केले. सूत्रसंचालन निलेश दिवटे आणि लता गवळी यांनी केले. छाया रजपूत यांनी आभार मानले.