Breaking News

पहिल्या लग्नाचा घटस्फोट न घेताच लावले दुसरे लग्न पत्नीसह नातेवाईका विरूध्द न्यायालयाची कारवाईबुलडाणा,(प्रतिनिधी): पहिल्या लग्नाचा घटस्पोट न घेताच दुसरे लग्न करून फसवणूक केल्या प्रकरणी नेहा दिपक तिडके व तीच्या दहा नातेवाईकां विरूध्द पुणे येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी फौजदारी कोर्टाने अटक वारंट जारी केला.

या प्रकरणाची हककीत अशी की, नेहा दिपक तिडके हीचे पहिले लग्न सन 2012 ला औरंगाबाद येथे विशांत सोनोने हयाचेशी झाले होते. लग्नाच्या अवघ्या एका महिण्यातच नेहा हिने घरातील दागीणे आणि पैसे घेवून आपल्या माहेरी खागमाव येथे निघून गेली होती. दरम्यान नेहा हिचा विशांत याच्याकडून घटस्फोट झालेला नसताना नेहा हिने व तिच्या नातेवाईकांनी नेहाचे दुसरे लग्न लावून दिले. काही महिण्यानंतर विशांतला ही बाब कळाली त्याने चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर विशांतने सर्व पुराव्यानिशी पूणे येथील न्यायालयात नेहा व तिच्या नातेवाईका विरूध्द भादंवि कलम 420,495, 109 अन्वेय याचिका दाखल केली. विशांत सोनोने याने न्यायालयासमोर नेहाच्या पहिल्या लग्नाचे प्रमाणपत्र व ईतर पुरावे आणि पोलीसांचा चौकशी अहवाल सादर केल्यानंतर पुणे येथील फौजदारी न्यायालयाने नेहा दिपक तिडके व तीचे वडील दिपक काशीराम तिडके, आई अनिता दिपक तिडके, आजी अन्नपूर्णाबाई काशिराम तिडके, काका अशोक काशिराम तिडके, यांच्यासह मावशी व मावसा अशा दहा जणाविरूध्द अटक वारंट जारी केला आहे.दरम्यान या सर्व आरोपींना न्यायालयाने 24 ऑक्टोंबर रोजी पुणे येथिल न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.