पदार्पणाच्या कसोटीत पृथ्वीचे ‘शॉ’नदार शतक


राजकोट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात राजकोट येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात युवा खेळाडू पृथ्वी शॉने दमदार कामगिरी बजावली आहे. पदार्पणाच्या सामन्यातच शतकी खेळी करत क्रीडा विश्‍वाची मने जिंकली. 15 चौकारांची आतिषबाजी करत 99 चेंडूत 101 धावा काढल्या. सलामीच्या सामन्यात त्याने हे शतक ठोकले आहे. कसोटीत पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी हा भारताचा पंधरावा तर चौथा युवा खेळाडू ठरला आहे. पृथ्वीने पहिल्याच कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावत इतिहास रचला. 18 वर्ष 329 दिवसांच्या पृथ्वीने विडीजच्या गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. 

सुरुवातीपासूनच तो आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. पृथ्वीचे शतक होताच मुंबईत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. पृथ्वी आणि पुजाराने शतकी भागीदारी केली. या भागीदारीत पुजाराने त्याला सुरेख साथ दिली. तोही शतकाच्या जवळपास पोहचला आहे. इंग्लंडमध्ये मुरली विजय आणि शिखर धवनची अनुभवी जोडी अपयशी ठरल्यावर टीम इंडियाने पृथ्वीला बोलावून संघात नवा प्रयोग केला. तो यशस्वी ठरला आहे. शिखर धवनची जागा भरुन काढण्याचे काम पृथ्वीने केले आहे. इंग्लंडच्या दौर्‍यातही त्याची निवड करण्यात आली होती. मात्र त्या दौर्‍यात केवळ पर्यटक बनून राहिला. त्याला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. पृथ्वी शॉने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 14 सामन्यात 1418 धावांचा रतीब घातला आहे. त्यात 8 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget