Breaking News

वाढीव विजबिलामुळे हाॅटेल व्यवसाय अडचणीत

शिर्डी / प्रतिनिधी 

महावितरणचे गेल्या तीन महिन्यापासुन येणारे विज बिल पहाता अगोदराच्या विजबिला पेक्षा तीस ते चाळीस हजाराने येणारे वाढिव बिलाचा काहींनी चागंलाच धसका घेतला आहे. या अगोदर ४० रुमच्या हाँटेलला महीन्याकाठी चाळीस पन्नास हजाराच्या बिलात वाढ होवुन तेच बिल आता ८० ते ९०हजाराच्या घरात येत आहे. त्यामुळे वाढीव विजबिलामुळे हाॅटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. शिर्डीत न होणारी गर्दी यामुळे हाॅटेल मालक व चालक सध्या मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त दिसुन येत आहेत. शिर्डी शहराचे अर्थकारण हे गर्दीवर अवलंबून आहे. साईबाबा भक्तांची गर्दीच अनेकांना रोजगार देणारी आहे. त्याला हाॅटेल उद्योगसमुहसुध्दा अपवाद नाही. अनेकांनी सरकारी तर काहीनी पतसंस्था व सहकारी बँकांचे कर्ज घेऊन हाॅटेल बांधली. काही काळ पैसा मिळाला. एकमेकाची हाॅटेल पाहून अनेकांना या व्यवसायत उतरण्याचा मोह आवरला नाही. मात्र आता महावितरणच्या वक्रदृष्टीने हा व्यवसाय अडचणीत आला आहे.