Breaking News

‘हातात मोबाईल घरात फोन, उघड्यावर शौचाला बसलंय कोण’


नेवासा प्रतिनिधी

येथील सेवेन्थ डे इंग्लिश स्कूलच्यावतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियनाअंतर्गत स्वच्छता रॅली काढण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी समीर शेख यांच्या हस्ते फित कापून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्या हातात असलेल्या फलकांमुळे चांगलीच जनजागृती झाली. यातील ‘हातात मोबाईल घरात फोन, उघड्यावर शौचाला बसलंय कोण’ या फलकाची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. 

प्राचार्य रावसाहेब बत्तीशे, मुख्याध्यापक सुदर्शन मेल्लम यांच्यासह शिक्षक रवि पंडित, किरण गवारे, नरेंद्र आढाव, मिलिंद सराफ, बाबासाहेब हारदे, नानासाहेब साळवे, जया मेल्लम, मनीषा सोनवणे, वर्षा डौले, शैला बत्तीशे, संगिता नाडे, जया आढाव, मीनाक्षी लोखंडे, लीना काकडे, मोहिनी म्हैसमाळे, मंगल उमाप, प्रविण आढाव, आरोग्य विभाग प्रमुख योगेश गवळी, प्रताप कडपे, उत्तम वाघमारे तसेच सर्व शिक्षक वर्ग व शाळेचे विदयार्थी, नेवासा नगरनगरपंचायतचे सर्व सफाई कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता आणि सामाजिक आरोग्याचा मौलिक संदेश देण्यात आला. दैनंदिन साफसफाई, स्वच्छतेच्या सवयी लावणे, शौचलयाचा नियमित वापर करणे आदींसह स्वच्छतेबाबत घोषणा देण्यात आल्या. ही रॅली बसस्थानक येथून निघून मेन रोड, गणपती चौक, महाराष्ट्र बँक, नगरनगरपंचायत चौकमार्गे शाळेत आली. येथेच रॅलीचा समारोप करण्यात आला.

बापू आणि स्वच्छतेचे समीकरण

दरवर्षी २ ऑक्टोबरला येत असलेल्या महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी देशभर स्वच्छतेचे जसे उपक्रम हाती घेण्यात येतात, त्यादृष्टीने दैनंदिन जीवनात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यासाठी स्वछता सप्ताह पाळण्याची गरज असल्याचे अनेकांनी सांगितले. एकूणच महत्मा गांधी अर्थात ‘बापू’ आणि स्वच्छतेचे एक समीकरणच देशभर तयार झाले असून यासाठी विद्यार्थ्यांसह सर्वांनीच या उप्रक्रमात सहभागी होण्याची गरज आहे.