Breaking News

फाेटाेग्राफर एकता ग्रुप काेपरगाव तालुका च्या वतीने अपघाती विमा संरक्षण पॉलिसी चे वितरण


कोपरगाव श. प्रतिनिधी :

येथील एकता ग्रुप फाेटाेग्राफर असोसिएशनवतीने तालुक्यातील छायाचित्रकारांना अपघाती विमा संरक्षण पॉलिसीचे वितरण नुकतेच कारण्यात आले. नामदेवराव परजणे गाेदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्या उपस्थितीत आले. याप्रसंगी येवला येथील ज्येष्ठ छायाचित्रकार दत्ता सा़ळी यांना लाेककलावंत सांस्कृतिक मंच तैलचित्रकार पुरस्कार सन्मान करण्यात आला. तसेच कुणाल जायकर यांना चित्रगुप्त पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी अरूण कदम यांनी प्रास्तविक केले. परजणे यांनी सांगितले, की आज प्रातिनिधिक स्वरूपात पॉलिसीचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित छायाचित्रकार सभासदांना २० लाख रुपयांची विमा संरक्षण पॉलिसी नामदेवराव परजणे गाेदावरी दूध संघाच्यावतीने लवकरच प्रदान करण्यात येईल. यावेळी अरूण कदम, हेमचंद्र भवर, शंकर दुपारगुडे, शैलेश शिंदे, युसूफ रंगरेज, प्रविण आभाळे, राहूल निकम, ज्ञानेश्वर टुपके, याेगेश वाडेकर, प्रविण लहिरे, युसूफ रंगरेज, विशाल पुरी, मच्छिंद्र वाघ, सागर पवार, अक्षय माेरे, साेपान आढाव, चंद्रकांत चाेपडे, अजय बागडे, महेश मलिक, राहुल आभाळे आदी छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश नाईक यांनी केले. प्रविण आभाळे यांनी आभार मानले.