Breaking News

‘कृष्णलिला’ नाटिका संगमनेरकरांसाठी ठरली संस्मरणीय


संगमनेर प्रतिनिधी

येथील सामाजिक कार्यकत्या कांचन थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडीया व सांस्कृतिक कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महिला मंडळाच्यावतीने सादर करण्यात आलेली कृष्णलिला ही नाटिका संगमनेरकरांसाठी संस्मरणीय ठरली.

येथील ‘यशोधन’ शेतकी संघाच्या प्रांगणात झालेल्या या दिमाखदार सोहळ्याच्या व्यासपीठवर राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, अध्यक्षा कांचन थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, शरयु देशमुख, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती ललिता दिघे, सचिव सिमा काकड, कार्याध्यक्षा शारदा सातपुते, शैला आवारी आदी उपस्थित होत्या.

यावेळी बोलतांना आ. थोरात म्हणाले, संगमनेर शहर हे सांस्कृतिकदृष्ट्याा वैभवशाली आहे. येथे सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन होत असते. नवरात्र उत्सव हा महिलांसाठी आनंदाची एक मोठी पर्वणी असते. महिलांचा समाजाच्या विकासात मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळेच नवरात्र उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम हे भविष्यात संगमनेरचे वेगळे वैशिष्ट्य ठरेल. यावेळी आ. डॉ. तांबे, कांचन थोरात, दुर्गा तांबे आणि शरयु देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ढोल व लेझीम पथकात काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. सुरुवातीला विनोद राऊत यांच्या सुरेल भजनांनी कार्यक्रमात भक्तीमय वातावरण निर्माण केले.

यावेळी शिवाजीराव थोरात, लक्ष्मणराव कुटे, चंद्रकांत कडलग, निशा कोकणे, रामहरी कातोरे, सुभाष सांगळे, निर्मला गुंजाळ, स्वाती शहा, स्वाती विखे, सुनिता कांदळकर, शालन गुंजाळ, डॉ. प्रमोद पावसे, रविबाला देशमुख, मनिषा थोरात, अक्षय वामन, विष्णू राहटळ, अ‍ॅड. अशोक हजारे, प्रा. बाबा खरात, लता कातोरे, बबन खेमनर, रविंद्र सोनवणे, सचिन गुंजाळ, प्रविण पानसरे, संजय वाळे, केशव मोकळ, मार्तंड गोसावी आदी उपस्थित होते. प्रारंभी कांचन थोरात यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. यावेळी महिला, युवती आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विशाल काळे यांनी आभार मानले.