Breaking News

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची बैठक उत्साहात


कोपरगाव श. प्रतिनिधी : 

येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची बैठक अबूबकर मनियार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष सिमोन जगताप यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पाडली. समता नागरी सहकारी पतसंस्था हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत १३ ऑक्टोबर रोजी धर्मांतर घोषणेच्या वर्धापनदिनाचे नियोजन करण्यासंदर्भात आणि शाखेचे नियोजन, पक्षबांधणी, संघटन या संदर्भात चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन रविंद्र जगताप यांनी केले. या बैठकीसाठी राहता तालुकाध्यक्ष आकाश साळवे, विशाल कोपरे, शामराव मोकळ, अरविंद अंभोरे, सरदार गुलाब शेख, शिवा कांबळे, तोफिक शेख, राजेंद्र घोडेराव, नानासाहेब मोरे, विशाल बागडे, रुपलाल शिंदे, अनिल खंडीझोड, गणेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन शिंदे यांनी आभार मानले.