Breaking News

जोगेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवास सुरुवात


आष्टी (प्रतिनिधी)- तालुक्यातील पारगाव (जो) येथील प्रसिध्द जोगेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवास १० अक्टोंबर पासुन सुरुवात झाली आहे. येथे जोगेश्वरी देवीचे हेमापंथी मंदिर असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र हा उत्सवास सुरुवात झाली असून, शारदीय नवरात्रात देवीची उपासना केली जाते. तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळजन्य परिस्थिती वाढतच चालली असल्याने पिण्याचे पाणी, जनावरांचा चा-याचा प्रश्न निर्माण होत असून, शेती उत्पन्न घटत चालले आहे. त्यामुळे, शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. म्हणून, तालुक्यात भरपूर पाऊस होऊन संपूर्ण तालुका दुष्काळमुक्त व्हावा. अशी प्रार्थना करुन ह.भ.प. विठ्ठल महाराज गहिनाथगडकर व आ.भिमराव धोंडे यांच्या पत्नी सौ. दमयंतीताई धोंडे यांच्या हस्ते सकाळी १०.०० वा मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. यावेळी ह.भ.प. सविताताई शास्त्री, बाळासाहेब आजबे, सतिश शिंदे, उध्दव दरेकर, जयदत्त धस, आष्टा ह.ना. गट प्रमुख दादा जगताप, सुधाकर कुलकर्णी, सरपंच तात्यासाहेब कदम, ग्रा.प.सदस्य दिपक भोराडे उपस्थित होते. 

१० आक्टोंबर ते १८ आक्टोंबर नवरात्र उत्सव निमित्त ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली पठाडे, ह.भ.प. वैजिनाथ महारज जगदाळे, ह.भ.प. कु. नेहाताई महाराज भोसले, ह.भ.प. विनोद महाराज रोकडे, बालकिर्तनकार ह.भ.प. विजय महाराज नेहरे, ह.भ.प. अंकुश महाराज साखरे, ह.भ.प. रामदास महाराज गर्जे, ह.भ.प. प्रणालीताई महाराज पोकळे, ह.भ.प.सर्जेराव महाराज गावडे, ह.भ.प. शिवाजी महाराज जगताप,ह.भ.प. गौरीताई महाराज सांगळे, मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जोगेश्वरी देवस्थान तालुक्यातील प्रसिध्द देवस्थान असुन नवरात्र उत्वात मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. घटस्थापनेसाठी तालुक्यातील पारगाव, बळेवाडीसह पंचक्रोशीतील भाविक मोठया संख्यने उपस्थित होते.