माजलगाव धरणाला स्व.वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे-आ.देशमुख


माजलगाव(प्रतिनिधी):- माजलगाव तालुक्यासह परळी, तालुक्याला सुजलाम सुफलाम करणार्‍या माजलगाव धरणाला ज्यांच्या मुळे हे धरण झाले ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे अशी मागणी आ.आर.टी.देशमुख यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. 

माजलगाव येथील सिंधफणा नदी वरती मोठा प्रकल्प उभारण्यात आला माजलगाव प्रकल्प म्हणून तो ओळखला जातो हा प्रकल्प माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्व वसंतराव नाईक यांनी मंजुर केला होता त्यांच्या या निर्णया मुळे माजलगाव सहित आजूबाजूच्या ५ ते ६ तालुक्याला फायदा होऊन माजलगाव तालुका ग्रीन बेल्ट म्हणून उदयास आला परिसरात साखर कारखाने उभारण्यात आले परिणामी शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती झाली स्व वसंतराव नाईक यांनी मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्प हा सुरवातीला माजलगाव व परतूर तालुक्याच्या हद्दी वरील जायकवाडी येथे मंजूर केला होता परंतु शेतकर्‍यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प पैठण येथे उभारण्यात आला प्रकल्पाचे नाव मात्र माजलगाव तालुक्यातील जायकवाडी वरून ठरले तालुक्यातून मोठा प्रकल्प इतरत्र गेल्यामुळे बीड जिल्ह्याला मोठा फटका बसला त्यामुळे तालुक्यातील सिंधफना नदीवरती जायकवाडी टप्पा क्रमांक २ नाईक साहेबांनी मंजूर केला नंतर शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात माजलगाव प्रकल्प पूर्ण झाला त्या मुळे खर्‍या अर्थाने लोकनेते स्व.वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टी मुळे माजलगाव तालुका व परिसर सुजलाम सुफलाम झाल्याने माजलगाव प्रकल्पाला स्व लोकनेते माजी वसंतराव नाईक प्रकल्प असे नाव देण्याची मागणी आ.आर.टी.देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget