Breaking News

अकोल्यात कर्जबाजारी शेतकर्याची बायको, मुलीसह आत्महत्याअकोले तालुक्याती चास गावातील एकाच कुटुंबात तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बातमीने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

पांडूरंग राधू शेळके वय 31 तर पत्नी सोनाली शेळके वय 22 असं या जोडप्याचं नाव आहे. या दोघांनी त्यांची मुलगी शिवन्यासह स्वत:लाही गळफास लावून घेतला आहे. काल रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

नवरा, बायकोने 2 वर्षाच्या चिमुरडीलाही गळफास लावून आत्महत्या केली आहे. अवघ्या 2 वर्षाच्या चिमुरडीला गळफास लावताना या माता-पित्यांचं हात सरसावलेच कसे असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.