Breaking News

शवविच्छेदन गृह सुरू करण्यासाठी आंदोलनसाखरखेर्डा,(प्रतिनिधी): मागील 15 वर्षांपासून उभारण्यात आलेले शवविच्छेदन गृह सुरू करावे, या मागणीसाठी काल तालुक्यातील साखरखेर्डा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पं. स. सभापती राजू ठोके यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. साखरखेर्डा हे गाव 52 खेड्याच्या केंद्रस्थानी आहे. येथे शवविच्छेदन गृह असूनही मृतदेह 25 किमी. अंतरावरील मेहकरला न्यावे लागत होते. मात्र मेहकर येथील वैद्यकीय अधिकारी हे शवविच्छेदन करण्यासाठी नकार देतात. त्यामुळे मृतदेह 70 किमी. अंतरावरील सिंदखेडराजाला न्यावा लागतो. त्यामुळे साखरखेर्डा येथील शवविच्छेदन गृह तातडीने सुरू करावे, अशी मागणी पं.स. सभापती राजू ठोके व साहित्यिक अजिम नवाज राही, सिं.राजाचे शिवदास रिंढे, गोरेगावचे सरपंच संजय पंचाळ आदींनी आरडीसी वर्‍हाडे, जिल्हा शल्यचिकित्सक, एसपी डॉ. भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. आज साखरखेर्डा येथे रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी जि. प. गटनेते राम जाधव, माजी सरपंच कमळाकर गवई, दिलीप बेंडमाळी, शिवा पाझडे, रणजित खिल्लारे, संतोष मंडळकर, गोपाल ठाकूर, गोपाल शिराळे, अमोल दानवे, सोनू पवार, समीर पठाण, दत्ता घोडके, विष्णू, गणपत अवचार, गायकवाड, रवी खराडे, अशोक इंगळे, सोमेश इंगळे, संतोष गाडेकर यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.