समाजाला सोबत घेऊन लोकाभिमुख व्हायला शिका : दत्ता बारगजे


बुलडाणा,(प्रतिनिधी): आजार वेगवेगळे असतात. परंतु, आजारातील रुग्णांचे आजारपण दूर करणारे प्रसंग स्पंदनातून व खाऊ घालण्यातून जोपासल्या जातात. असेच आजारपण एचआयव्ही ग्रस्तांचे असलेतरी कोणताच प्रसंग मायेतून निर्माण होत नाही. या आजारपणाला सांभाळण्याचे काम बीडच्या डोंगरपठारावर करताना कोणताही त्रास आम्हाला होत नाही. 22 विधवा स्त्रियांच्या हातचे जेवणच आम्ही करत आहोत. एकटे नव्हेतर अख्खे कुटुंबच करत आहोत. कारण ‘छु लेनेसे बिमारी नही बढती छु लेने से तो प्यार बढता है’ त्यामुळे समाजाला सोबत घेऊन लोकाभिमुख व्हायला शिका, असे प्रबोधन बीड येथील समाजसेवक दत्ता बारगजे यांनी केले. येथील सामाजिक न्याय भवनाच्या सामाजिक सभागृहात 21 ऑक्टोबर रोजी सामाजिक भावना जोपासत समाजात काम करणार्‍या मान्यवर संस्था,व्यक्ती,शिक्षक,डॉक्टर यांसह पर्यावरणवादी मंडळींचा दिव्यरत्न जीवन गौरव पुरस्कार सोहळा 2018 मध्ये पुरस्कार देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. या वेळी या मान्यवरांच्या सन्मानप्रसंगी ते बोलत होते. समाजाच्या समस्या मोडण्याचे काम आपण करतो. मात्र समस्या या काही रात्रीतून संपत नाही. समस्या या अंशतः संपते पूर्णत: नाही. समाजाला सोबत घेऊन लोकाभिमुख व्हायला शिका. म्हणजे तुम्ही दीपस्तंभ व्हाल. दात्यांना दाखविल्यापेक्षा दात्यांनी स्वत:च दिले पाहिजे. त्यामुळे समस्या जोडण्याचे काम करा असे मार्गदर्शन दत्ता बारगजे यांनी केले. पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन हा सत्कार करण्यात आला. दिव्या फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जि. बुलडाणाचे वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दत्ता बारगजे, संध्या बारगजे यांची प्रमुख उपस्थिती होती. दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांचे हस्ते हा सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी रमेश घेवंदे , कवी गणेश चंदनशिवे, ठाणेदार यू. के. जाधव यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. दिव्या फाउंडेशनचे अशोक काकडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालन व आभार प्रदर्शन रमेश आराख यांनी केले. सुरेश साबळे, डी.आर.इंगळे यांची यावेळी उपस्थिती होती.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget