Breaking News

न्यू हायस्कूल सादोळा शाळेत नवनिर्वाचित शोलय समितीचा सत्कार


माजलगाव (प्रतिनिधी) -सादोळा ता.माजलगांव येथील न्यू हायस्कूल सादोळा शाळेत माजी मंत्री तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते नवनिर्वाचित स्थानिक शालेय समितीचा सत्कार करण्यात आला. तसेच वै.भगवानभाऊ सोळंके यांच्या स्मरणार्थ दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मा.प्रा.प्रदिप सोळंके यांच्या तर्फे बक्षीस देवून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना मा.प्रकाशदादा सोळंके यांनी नवनिर्वाचीत शालेय समिती व सर्व शिक्षकांनी अहोरात्र अभ्यास व मेहनत करून शाळेची गुणवत्ता उंचावून आदर्श निर्माण करावा. केवळ शिक्षण देण्यावरच नव्हे तर संस्कार देण्यावर अधिक भर द्यावा असे सुचित केले. शालेय समितीच्या अध्यक्षपदी श्री.बिपीन राजेसाहेब सोळंके यांची तर सदस्य पदी डॉ.अरूण सुभाषराव सोळंके, श्री.जगन्नाथ रामराव गायके, सौ.माधुरी विकासराव सोळंके, श्री.सोनाबापु देविदासराव सोळंके, श्री.प्रमोद रामराव सोळंके, श्री.राजेभाऊ मंचकराव सोळंके, सौ.पुष्पा सत्यप्रेम सोळंके, श्री.संजय सोमेश्वरराव सोळंके, श्री.सुरेश घोडे, श्री.बाळु मोहन गुंजाळ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. दहावीच्या गुणवंत विद्यार्थीनी कु.आरती प्रभाकर वाशिंबे, कु.रूपाली प्रविण मोहिते, कु.ज्योती विठ्ठल सुरवसे, यांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस मा.प्रकाशदादा सोळंके, संचालक मा.विजयकुमारजी काका सोळंके तसेच मान्यवरांचे लैझीम पथकासह शाळेत स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रा.प्रदिप सोळंके, श्री.सोनाबापु सोळंके व श्री.ज्ञानेश्वर आबुज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी मा.विजयकुमारजी सोळंके, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील असोसीएट डायरेक्टर मा.व्ही.डी. साळुंके, मा.जीवनरावजी साळुंके, मा. सुशिलनाना साळुंके, मा. बंकटराव साळुंके, मा. हरिभाऊ साळुंके, मा. उत्तरेश्वरभाऊ साळुंके, गावातील जेष्ठ नागरीक, सर्व शालेय समिती सदस्य, ग्रामपचायत सदस्य व तरूण मंडळ यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 
मा. सुशिलनाना सोळंके यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.तौर ए.टी. , सुत्रसंचलन श्री. मगर ए.ई. ांनी तर आभार प्रदर्शन श्री.धरपडे बी.एस. यांनी केले.