Breaking News

नक्षलवाद्यांचा हल्ल्यात दोन जवान शहीद; दूरदर्शन प्रतिनिधीचाही हल्ल्यात मृत्यू


दंतेवाडा : छत्तीसगड विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच नक्षलवाद्यांचा धुमाकूळ वाढला आहे. आज अरनपूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. यात दोन जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले आहेत. याशिवाय दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. परिसरात जवानांकडून शोध मोहिम सुरू असताना हा हल्ला झाला. 

या हल्ल्यात दोन सुरक्षा दलाचे जवानही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएसपी अभिषेक पल्लव यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. हा हल्ला अरनपूरच्या निलावाया भागात झाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी विजापूर येते 27 ऑक्टोबरला नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता. यात सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले होते. तर दोन जवान गंभीर जखमी झाले होते.