मासेमारीच्या वादातून एकावर सत्तूरने हल्ला; चौघांवर ट्रॉसिटीमाजलगाव, (प्रतिनिधी): गुत्तेदाराच्या परस्पर मासेमारी करून थेट विक्री करताना अडविल्याच्या रागातून गुत्तेदाराच्या कर्मचार्‍याच्या डोक्यात सत्तूर घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर ट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. शनिवारी दुपारी माजलगावच्या केसापुरी कॅम्प येथे ही घटना घडली होती.
तालुक्यातील मंगरूळ येथील धम्मपाल अनिरुद्ध लोखंडे हे अर्जुन नाईकवाडे यांच्याकडे मासेमारीचे काम पाहतात. शनिवारी सायंकाळी ते केसापुरी कॅम्पच्या पाठीमागील भागात पाण्याच्या टाकीजवळ थांबले असता राजाराम मारोती घटे (रा. केसापुरी कँम्प) हा व्यक्ती धरणाच्या पाण्यातून मासे पकडुन घेऊन जात असल्याचे दिसून आले. धम्मपाल लोखंडे यांनी त्याला पकडलेले मासे मत्स्य केंद्रावर देण्यास सांगितले. राजारामनेही त्यास होकार दिला. परंतु, त्याचा संशय आल्याने धम्मपाल यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. अखेर त्यांचा संशय खरा निघाला. राजारामने मासे केंद्रात न देता आय.टी.आय कॉलेजच्या समोर बसून त्याची विक्री करू लागला. धम्मपाल आणि शेख पाशा शेख नसीर यांनी याबाबत जाब विचारल्याने चिडलेल्या राजारामने मासे कापण्याच्या सत्तूरने धम्मपालच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी शेख पाशा यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता जवळच असलेले गजानन मारोती घटे, परमेश्वर सुभाष घटे आणि भिमा विष्णु गहिरे (सर्व रा. देवगाव, ता. वडवणी) यांनी दोघांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या धम्मपाल यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयातउपचार सुरु आहेत. याप्रकरणी धम्मपाल लोखंडे यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपींवर कलम ३०७, ३२३, ३२६, ३४, ५०४, ५०६ आणि ट्रॉसिटी कायद्यान्वये माजलगाव शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget