Breaking News

सावकाराने विष पाजले; इसमाचा मृत्यु तलवाडा येथील प्रकरण


बीड, (प्रतिनिधी):- तलवाडा येथील एका ४० वर्षीय इसमाला दि.८ रोजी सायंकाळच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात अत्यावस्थ अवस्थेत दाखल केले होते. उपचार सुरू असतांना काल पहाटे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान सावकाराने ५० हजार रूपयांसाठी मारहाण केल्यानंतर संबंधीत इसमास विष पाजून जिवे मारल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सदरील प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून सावकाराला अटक करा या मागणीसाठी आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले. 

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील भानुदास गेणा शिंदे (वय ४०) यांना दि.८ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात अत्यावस्थ अवस्थेत दाखल करण्यात आले होते. काल पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. भानुदास शिंदे यांना तेथीलच एका खासगी सावकाराने ५० हजार रूपयांसाठी मारहाण करून विष पाजले होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शिंदे यांचे भाऊ व त्यांच्या मुलाने केला आहे. सावकाराने काल घरात घुसुन आईला मारहाण करून वडिलांना गाडीत टाकून नेले. त्यानंतर त्यांना विष पाजून मारले असून संबंधीत सावकाराला अटक करा अशी मागणी मयत भानुदास शिंदे यांच्या मुलाने केली आहे. सदरील मागणीवरून आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी सावकाराच्या अटकेची मागणी करत शवविच्छेदन रोखले.या प्रकरणी तलवडा पोलीस ठाणात सात लोका विरोधात कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे.