Breaking News

घरभेदी असला, तर विरोधकांची गरजच काय?

राम मंदिराचा प्रश्‍न न्यायप्रवीष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयानं 29 तारखेपासून नियमित सुनावणी करण्याचं जाहीर केलं आहे. असं असताना एखाद्या केंद्रीय मंत्र्यानं वादग्रस्त विधानं करावीत, याला काय म्हणावं? राम मंदिरावरुन भाजपवर वारंवार विरोधकांकडून टीका होता होत असताना दुसरीकडं नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं त्यात भर टाकत आहेत. गिरीराज सिंह यांनी राम मंदिरासाठी मुस्लिमांनी सहकार्य करावं, अन्यथा काहीही होऊ शकतं असं उघडउघड धमकावलं आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री असलेल्या सिंह यांनी, हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांनी राम मंदिर उभं करण्यासाठी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. जर राम मंदिर झालं नाही, तर हिंदूंची मनं दुखावतील. यानंतर काहीही होऊ शकतं’, असं म्हटलं आहे. गुजरातमधून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांना बाहेर काढलं जात असल्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. हे काँग्रेसमुळेच होत असल्याचं ते म्हणाले आहेत. गिरीराज सिंह याआधीही अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत आले आहेत. याआधी लोकसंख्येवर बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
....................................................................................................................................................
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षातच इतके वादग्रस्त नेते आहेत, की विरोधकांनी त्यांना विरोध करण्याची आवश्यकताच नाही. लोकशाहीत विरोधकांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते नाकारण्यात अर्थ नाही; परंतु जसे काँग्रेसमध्ये वाचाळवीर भरपूर आहेत, तसेच ते भाजपमध्येही आहेत. काँग्रेसला सत्ताच्युत करण्याला विरोधकांपेक्षाही त्यांच्यातील काही वाचाळवीर जबाबदार होते. आताही विरोधकांपेक्षाही भाजपतील वाचाळवीरच मोदी यांची डोकेदुःखी वाढवीत आहेत. विशेष म्हणजे मोदी व पक्षाध्य्क्ष अमित शाह यांनी तंबी देऊनही वादग्रस्त विधानं करून त्याची जनतेत काय प्रतिक्रिया उमटते, हे पाहिलं जात असावं. राम मंदिरावरून तर भाजपनं बर्‍याचदा धरसोड भूमिका घेतली. राम मंदिराचा प्रश्‍न न्यायप्रवीष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयानं 29 तारखेपासून नियमित सुनावणी करण्याचं जाहीर केलं आहे. असं असताना एखाद्या केंद्रीय मंत्र्यानं वादग्रस्त विधानं करावीत, याला काय म्हणावं? राम मंदिरावरुन भाजपवर वारंवार विरोधकांकडून टीका होता होत असताना दुसरीकडं नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं त्यात भर टाकत आहेत. गिरीराज सिंह यांनी राम मंदिरासाठी मुस्लिमांनी सहकार्य करावं, अन्यथा काहीही होऊ शकतं असं उघडउघड धमकावलं आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री असलेल्या सिंह यांनी, हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांनी राम मंदिर उभं करण्यासाठी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. जर राम मंदिर झालं नाही, तर हिंदूंची मनं दुखावतील. यानंतर काहीही होऊ शकतं’, असं म्हटलं आहे. गुजरातमधून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांना बाहेर काढलं जात असल्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. हे काँग्रेसमुळेच होत असल्याचं ते म्हणाले आहेत. गिरीराज सिंह याआधीही अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत आले आहेत. याआधी लोकसंख्येवर बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 2047 मध्ये पुन्हा एकदा देशाची फाळणी होईल’, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. सध्या 35अ वरुन वाद सुरु आहे, मात्र आगामी काळात भारताचा उल्लेख करणंही कठीण होईल’, असंही ते म्हणाले होते. काँग्रेससहित अनेक विरोधी पक्षांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. बेजबाबदार वक्तव्य करू नका, अशी वक्तव्य मला मंजूर नाहीत. भाजपचे हितचिंतक असल्याचा दावा करणार्‍या लोकांकडून अशी क्षुद्र वक्तव्य झाल्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरून प्रचार भरकटत आहे. अशी वक्तव्य करू नका, असं आवाहन मी करतो, असं मोदी यांनी ट्विटरवरून सांगितलेल्याला आता साडेचार वर्षे झाली, तरी त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांचं ऐकायला तयार नाहीत. अर्थात यावर कोण विश्‍वास ठेवील? जाहीर एक बोलायचं आणि वादग्रस्त वक्तव्यं करणार्‍यांना सरकारमध्ये संरक्षण द्यायचं, असं मोदी यांचं चालू आहे. सिंह यांनी मोदी विरोधकांना भारतात कोणतीही जागा नसल्याचं म्हटलं होते. प्रक्षोभक वक्तव्यं करणार्‍या नेत्यांवर मोदींनी कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली होती. त्यानंतर तेवढ्यापुरतं मोदी यांनी ट्वीट केलं होतं. मुस्लिम समाजाकडं व्होट बँक म्हणून पाहिलं जातं. त्याचमुळं या समाजाचं लांगुलचालन करण्यासाठी नेते टोप्या घालून इफ्तार पार्ट्यांची नौटंकी करताना दिसतात, असंही सिंह यांनी म्हटलं आहे. ज्यादिवशी भारतातले हिंदू व्होट बँक होतील, तेव्हा हेच नेते कपाळावर भस्म आणि चंदनाचे लेप लावून हिंदू धर्माचे सण साजरे करताना दिसतील आणि त्याचसोबत हिंदू समाजाला मतांचा जोगवा मागतील असं त्यांनी म्हटलं होतं. इतकंच नाही, तर भारतातल्या हिंदू समाजाला एकमेकांपासून वेगळं करून टाकलं आहे. त्यांच्यात दुही पसरवली आहे. हिंदूंकडं व्होट बँक म्हणून पाहिलं जात नाही. त्याचमुळं देशात मुस्लिमांचं लांगुलचालन केलं जातं आणि इफ्तार पार्ट्यांमध्ये नेतेमंडळी टोप्या घालून सर्वधर्मसमभाव जपण्याचा संदेश देताना दिसतात, अशी टीका सिंह यांनी केली होती.
गिरीराज सिंह यांची जीभ घसरण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी देशातल्या मुलींना सुरक्षित ठेवायचे असेल, तर दोनच अपत्ये जन्माला घाला’, हिंदूंची लोकसंख्या वाढली नाही, तर राममंदिर कसं उभारणार?’, नोटाबंदीनंतर केंद्रानं नसबंदीचा निर्णय घ्यावा’, सोनिया गांधी गोर्‍या नसत्या तर काँग्रेसनं त्यांना स्वीकारलं असतं का?’, राज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडले’ पत्नी आणि बहिणीमध्ये जो फरक असतो, तोच गोमांस इतर मांसामध्ये असतो’ ही आणि अशी अनेक वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी केली आहेत. मोदी यांनी त्यांची अनेकदा कानउघडणीही केली आहे. पालथ्या घड्यावर पाणी ही म्हण गिरीराज सिंह यांच्याबाबतीत तंतोतंत खरी ठरताना दिसतं आहे. कारण ते काही आपल्या जीभेवर ताबा ठेवायला तयार नाहीत. गिरीराज सिंह वादग्रस्त वक्तव्यं करतात. त्यानंतर आपला माफीनामा सादर करतात. मग काही दिवस शांत राहतात. त्यानंतर पुन्हा तोल सोडून वाट्टेल ते बरळतात. ज्या व्यक्ती बकर्‍याचं मांस खातात, त्यांना जर कुत्र्याचं मांस दिलं, तर ते खातील का? भारतीय लोक आपल्या आईशी आणि बहिणीशी समान धार्मिक नाते ठेवतात. आपण गायीशी सुद्धा अशाच प्रकारचे नातं ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींना विरोध करणार्‍यांनी पाकिस्तानात जावं, असं विधान सिंह यांनी केलं होतं.
यापूर्वी गिरीराज सिंह यांनी प्रचारादरम्यान भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करणार्‍यांनी पाकिस्तानात जावं असं वक्तव्य गिरीराज सिंह यांनी असे वक्तव्य केलं होतं. यानंतर सर्व स्तराच्या राजकीय पक्षांकडून सिंह यांच्यावर टीका होत होत्या. याप्रकरणी त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या ते जामीनावर कारागृहाबाहेर आहेत. आता गिरीराजसिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यात कोणतीच सुधारणा झालेली नाही. एका विशिष्ट समुदायातले सर्वजण दहशतवादी नसतात, पण सर्व दहशतवादी एकाच समुदायाचे कसे’ असा प्रश्‍न विचारून त्यांनी पुन्हा एकदा वाद उपस्थित केला आहे. 2017 मध्ये रामनवमीच्यावेळी झालेल्या दंगलप्रकरणी अटक झालेला बजरंग दलाचा कार्यकर्ता जितेंद्र प्रताप याची गिरीराज सिंह यांनी तुरुंगात जाऊन भेट घेतली होती. नितीश कुमार सरकार हिंदूंचा अपमान करत आहे, असे ते म्हणाले होते. सरकारनं रोजगार निर्मिती केली नसल्याचा किंवा रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याचा आरोप करणार्‍यांनी आपले चष्मे बदलण्याची गरज असल्याची उपरोधिक त्यांनी व्यक्त केली होती. गिरीराज सिंग यांच्याविरोधात निवडणूक आयोगानंही कारवाई सुरू केली होती.