Breaking News

आधार प्रकल्पांतर्गत दिवाळी निमित्त साहित्य वाटप

किल्ले धारूर (प्रतिनिधी)- माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या वतीने आधार प्रकल्प अंतर्गत निराधारांची माऊली आधार स्तंभ सौ. मंगलाताई प्रकाशदादा सोळंके यांच्या कल्पनेतून धारूर तालुक्यातील अनाथ निराधार असलेल्या ५० मुला-मुलींना ड्रेस व दीपावली फराळ किराणा साहित्य वाटप करण्यात आले. माजलगाव विकास प्रतिष्ठान आधार प्रकल्प खूप मोठ्या प्रमाणात वटवृक्ष तयार झालेला आहे या विकास प्रतिष्ठान मधून गोरगरीब निराधार मुलांना मुलींना दर वर्षी जून महिन्यात शालेय साहित्य वाटप केले जाते तर सौ मंगलाताई सोळंके या अनाथ निराधार मुलांना कपडे व दीपावली फराळाचे साहित्य वाटप केल्या शिवाय दीपावली साजरी करत नाहीत त्यांना साहित्य वाटप अगोदर करतात व नंतरच दीपावली साजरी करतात.

येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास सिरसाट हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे धारूर तालुकाध्यक्ष प्रा.ईश्वर मुंडे , शहर अध्यक्ष नितीन शिनगारे तालुका युवक अध्यक्ष सटवा अंडील, नगरसेवक संचित कोमटवार, आडस सामाजिक कार्यकर्ते राम माने, आवरगाव चे सरपंच अमोल जगताप, सरपंच बालासाहेब मायकर गणेश सावंत ,महादेव सव्वाशे ,सचिन जाधव, बाळासाहेब वेताळ संभाजी तिबोले सुहास सोळंके महादेव वाघ पत्रकार नाथा ढगे , पुरुषउत्तम सोळंके हे उपस्थित होते. यावेळी प्रा ईश्वर मुंडे, राम माने, शेषेराव फावडे डॉ शिवदास सिरसाट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून निराधारांचे मनोबल वाढवले.सर्व मान्यवर व माजलगाव विकास प्रतिष्ठान च्या सर्व कर्मचार्‍यांनी मुलांना कपडे व फराळी साहित्य वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली .