सरसंघचालक भागवतांना मोक्का लावा


संघाजवळील शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घ्यावी : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे असलेली एके 47 सारखे घातक शस्त्रास्त्र का बाळगण्यात येतात, या घातक शस्त्रास्त्रांचे दसर्‍याच्या दिवशी संघ बाहेर काढून पुजा करतो, असे सवाल करत संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांना मोक्का लावावा असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी केली. संघाजवळील शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घ्यावीत या मागणीसाठी गुरूवारी भारिपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करतांना आंबेडकर बोलत होते. देशाच्या सुरक्षेसाठी सैन्य आणि पोलीस यंत्रणा आहे. या यंत्रणांकडे देशाची सुरक्षा करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रे असतात. मग संघप्रमुख मोहन भागवत यांना अत्याधुनिक शस्त्रे का लागतात? संघाजवळील शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घ्यावीत किंवा सर्व नागरिकांना शस्त्रे द्यावीत,अशी मागणी यावेळी आंबेडकरांनी केली. 

सैन्य आणि पोलीस असताना नवे सैन्य कशाला? असा प्रश्‍न त्यांनी मोर्चाला संबोधित करताना उपस्थित केला. मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे एके 47 कुठून आल्या? याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. नागपूर पोलिसांनी या शस्त्राप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी या नकली पोलिसांना पकडावे, अन्यथा आम्हाला कोर्टात धाव घ्यावी लागेल. पोलिसांनी कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून महाराष्ट्रातील सर्व रस्ते बंद पाडू, असा इशारा आंबेडकरांनी यावेळी दिला.

संघ प्रतिसैन्य उभारत आहे का?
देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल आणि वायूदल आहे. राज्यात संरक्षणासाठी पोलिस आहेत. मग संघ नकली सैन्य कशासाठी उभारत आहे? असा सवाल आंबेडकरांनी केला. ते म्हणाले, या नकली सैन्याकडे असलेली शस्त्रास्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली नाही तर महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केले जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह इतर काही कडव्या विचारसरणीच्या संघटना खुलेआम शस्त्र वापरत आहेत. या शस्त्राद्वारे लोकांना भयभीत केले जाईल. यांचे सरकार पडणार असे समजले, तर हेच लोक पोलिसांवर शस्त्रे उगारतील, असा इशाराही आंबेडकरांनी यावेळी दिला. न्यायालय ारवाई का केली नाही? असा प्रश्‍न विचारणार मुख्यमंत्र्यांना नाही तर पोलिसांना विचारणार आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा सरकार बदलले तर पोलिसांना डिसमिस केल्याशिवाय राहणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget