Breaking News

अदिती काकडेचे बॉक्सिंग स्पर्धेत यश


प्रवरानगर प्रतिनिधी 

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माण शास्त्र महिला महाविद्यालय, चिंचोली महाविद्यालयाची द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी अदिती काकडे हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयोजित विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करून नेत्रदीपक यश संपादन केले, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. रेड्डी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अदितीचे अभिनंदन केले.