Breaking News

मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा-सौ.राऊत


बीड (प्रतिनिधी)- येत्या २३ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे बूथ प्रमुख व गटप्रमुखांच्या मेळाव्यात साठी बीड जिल्ह्यात येत आहेत बीड शहरातील रामकृष्ण लॉन्स येथे होणार्‍या या मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून बुथ प्रमुख व गटप्रमुख शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान शिवसेना शहर प्रमुख सौ लताताई राऊत यांनी केले आहे २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मिळणा व रामकृष्ण लॉन्स कॅनॉलरोड बीड येथे होणार आहे बुध प्रमुख व गटप्रमुखांच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे बूथ प्रमुख व गड प्रमुखांशी चर्चा करून आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीबाबत माहिती घेणार आहेत. या मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसह शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे ल्हिा संपर्कप्रमुख सुधीर जी मोरे महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख संपदा ताई गडकरी आदींसह इतर शिवसेना पदाधिकार्यांची मेळाव्यास उपस्थिती लाभणार आहे .

सदर मेळाव्यास बुथ प्रमुख व गट प्रमुखांसह शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे सौ लताताई राऊत बीड शहर अध्यक्ष शिवसेना महिला आघाडी यांनी केले आहे