Breaking News

राठोड यांनी उंचाविली महाराष्ट्राची मान


शेवगाव / प्रतिनिधी 

राठोड यांनी या स्पर्धेमध्ये पोलिसांना प्रस्तुत करत त्यांच्या कामाचा एक आराखडा तेथे सादर केला. महाराष्ट्र पोलीस दलाचा सन्मान वाढावा, यासाठी महाराष्ट्र पोलिसच्या वेशभूषेत त्यांनी तेथे सहभाग नोंदविला. यात त्या विजयी झाल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून राठोड यांनी साऊथ आफ्रिका जोहान्सबर्ग माइलस्टोन ग्लोबल वर्ल्ड विजेते होऊन महाराष्ट्राची मान उंचावली आहे. 

या स्पर्धेच्या ठिकाणी तेथील उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना प्रसंगी त्यांना सॅल्यूट करून त्यांचे कौतुकही केले. तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी पोलीस चिन्ह देऊन गौरविले. ही दि. २२ सप्टेंबरला संपन्न झाली. यावेळी जगभरातून ३२ स्पर्धक सहभागी झाले होते. मलेशिया, साउद आफ्रिका यूएससी, थायलंड अशी अनेक देश सहभागी होते. तेथे सब टायटल म्हणून रोड मॉडेल आणि द्वितीय क्रमांक राठोड यांनी बाजी मारली. अशा या जागतिक स्तरावर कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्राच्या मुली मागे नाहीत, त्यांनी दाखवून दिले. महाराष्ट्र आणि सोलापूरचे नाव संपूर्ण जगात नेल्याबद्दल अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या.