Breaking News

आष्टा येथील डिपी बसवण्याची नवनाथ आंधळे यांची मागणी


आष्टी, (प्रतिनिधी):- तालुक्यातील आष्टा येथील विद्युत डिपी गेल्या अनेक दिवसांपासुन बंद असुन यामुळे ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. याकडे विद्युत वितरण कंपनीचे लक्ष नसून शेतकर्‍यांना याचा मोठा बसत आहे. येथील डिपी तात्काळ बसवण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आंधळे यांनी केली आहे.

आष्टा येथील डिपी गेल्या अनेक महिन्यांपासुन बंद असुन यामुळे नागरिकांना याचा दैनंदिन त्रास सहन करावा लागत आहे. येथील कुठलाच पुढारी किंवा नेता या प्रश्‍नाकडे डोकावून पाहत नाही त्यामुळे हे काम रखडलेले आहे. विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनीही दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. सणासुदीच्या काळात तरी ही डिपी तात्काळ बसवावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आंधळे यांनी केली आहे.