Breaking News

‘सिम्बायोसिस’च्या प्राध्यापकांवर अत्याचाराचे आरोप


पुणे : लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या ’मी टू’च्या चळवळीने देशभरात मोठी चर्चा सुरू असतानाच सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधूनही लैंगिक शोषणाबाबतचे प्रकार समोर आले आहेत. या महाविद्यालयांतील काही आजी आणि माजी विद्यार्थिनींनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरोधात आपल्यावर झालेल्या अत्याचारबात सोशल मीडियावर लिहिले असून, या प्रकारांबाबत तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे. सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन विमाननगर येथे आहे. या महाविद्यालयांतील 10 पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी, विशेषत माजी विद्यार्थिनींनी 6 ऑक्टोबरपासून सोशल मीडियावर या प्राध्यापकांबाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली.यापूर्वीही सिम्बायोसिस कॅम्पसमध्ये अशा घटना घडल्या आहेत परंतु सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ.विद्या येरवडेकर यांनी अशा घटनेबाबत संबंधित प्राध्यापक यांच्यावर कडक कारवाई केली आहे. खूप जरी या घटना पुढे उशीरा येत असल्या तरी सिम्बायोसिस प्रशासनाने संबधित प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी गोर्‍हे यांनी केली.