Breaking News

मंडलाधिकारी गायकवाड लाच स्विकारतांना जेरबंद


पाथर्डी / प्रतिनिधी

तालुक्यातील टाकळीमानूरचे मंडलधिकारी भगवान गायकवाड यांना अहमदनगरच्या पथकाने ३ हजार रुपयांची लाच स्विकारताना पकडले आहे. यातील तक्रारदार यांच्या बहिणीचे सासरे यांनी सन २००१ मध्ये खरेदी केलेल्या जमिनीची महसूल दप्तरी नोंद प्रमाणित करण्यासाठी मंडलाधिकारी गायकवाड़ यांनी दि. १६ रोजी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार दि. १७ तहसील कार्यालय येथे तक्रारदाराकडून पंच साक्षीदारासमक्ष ३ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना गायकवाड यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, पो. हे. कॉ. तनवीर शेख, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गंगूल, महिला पो. कॉ. राधा खेमनर, चालक पो. ना. अशोक रक्ताटे या पथकाने केली.