जनता भाजपला जागा दाखवून देईल : चव्हाण


राहुरी तालुका प्रतिनिधी

जनतेमध्ये भाजप सरकारच्या विरुद्ध मोठा आक्रोश आहे. जनतेचा हाच आक्रोश समोर आणण्यासाठी नेहमी शेतकऱ्यांच्या बरोबर असणारे कॉंग्रेस जन संघर्षच्या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. भाजप सरकारला वैतागलेली जनता व शेतकरी येत्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देईल व जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रभर निघालेली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा राहुरी तालुक्यात येऊन पोहचताच या जनसंघर्ष यात्रेचे तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले. प्रथम राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी पुतळ्यासमोर डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हा. चेअरमन शामराव निमसे, युवानेते करण ससाणे, चैतन्य उद्योग समुहाचे चेअरमन गणेश भांड, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, संचालक मच्छिंद्र तांबे, केशवराव पाटील, बाळकृष्ण कोळसे, विजय डौले, मधुकर पवार, गोरक्षनाथ तारडे, नंदकुमार डोळस, अर्जुनराव बाचकर, मुळा-प्रवराचे व्हा. चेअरमन सचिन गुजर, जी. के. पाटील, नानासाहेब पवार, रामभाऊ लीपटे, संजय फंड, सुधीर नवले, ज्ञानेश्वर मुरकुटे, देवळालीप्रवराचे शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव कडू, राजेंद्र लोंढे, वैभव गिरमे, दीपक पठारे, अनंत कदम, रफिक शेख, विश्वास पाटील आदीनी या संघर्ष यात्रेचे स्वागत केले.

या वेळी रावसाहेब चाचा तनपुरे, तानाजी धसाळ, दादा सोनावणे, रमेश म्हसे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप पवार, नगरसेवक सोन्याबापू जगधने, नितीन तनपुरे, विक्रम भुजाडी, स्वप्नील पानसंबळ आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget