Breaking News

कळसूबाई शिखर येथून ज्योतीचे स्वागत


रुई येथील शिवशक्ति तरुण मंडळ व दत्त प्रतिष्ठानचे १५० युवक नवरात्र उत्सव निमित्त समुद्र सपाटीपासुन १ हजार ६०० मीटर ऊंच असलेले सर्वात ऊंच शिखर कळसुबाई येथे पायी ज्योत आणण्यासाठी गेले होते. ज्योत घेवून आल्यानंतर त्यांचे गावात जल्लोशात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

या युवकांमधे सर्व जाती धर्माचे युवक होते. त्यामुळे रुईमध्ये असलेल्या सामाजिक एकोप्याचे दर्शन होते. एक चांगला संदेश समाजामधे जातो. स्वागतासाठी मोठ्या संखेने गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. सरपंच संदीप वाबळे, ग्रा. पं. सदस्य विमल राठोड, अशोक कोळगे, योगेश जपे, आबासाहेब शिरसाठ, अशोक लोढा, राजेन्द्र राठोड, बाळकृष्ण सुराळे, ज्ञानेश्वर वाबळे, प्रवीण गोसावी, माऊली तुरकने, राजेन्द्र कोळगे, चाँद मनियार, आसिफ मणियार, भिकचंद सोनवणे, संभाजी बर्डे, संदीप जाधव, नाना भडांगे, रामा खरात, सुभाष वाबळे, अमोल खरात, अनिल कोळगे आदी उपस्थित होते.