बडोदा बँकेने केले साडेआठ कोटींचे कर्जवितरण


कोपरगाव श. प्रतिनिधी

येथील बडोदा बँकेच्यावतीने तालुक्यातील वेळेवर नियमीत कर्जफेड करणा-या शंभर शेतक-यांचा सत्कार सन्मान करून गरजूंना साडेआठ कोटी रूपये कर्जवितरण नुकतेच मंजूर केले. सहकार महर्षि शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात या कर्ज मंजुरीपत्राचे नुकतेच वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी बडोदा बँक पुणे महाप्रबंधक राजेश कुमार होते.

येथील लोढा मंगल केंद्रात बडोदा बँकेच्यावतींने शेतक-यांचा मेळावा पार पडला. प्रारंभी उपमहाप्रबंधक सुरेंद्र शर्मा व श्रीनिवास गवळे यांनी बडोदा बँक शेतक-यांसाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली. कोपरगांव बडोदा बँकेचे शाखाधिकारी छत्रपती धोंगडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

याप्रसंगी बोलतांना आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, की राष्ट्रीयकृत बँकांनी ग्रामीण भागातील महिलांना रोजगारवाढीसाठी महिला बचतगटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले. त्याची परतफेडदेखील या महिला प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यामुळे बडोदा बँकेने शेतक-यांबरोबरच महिलांनादेखील बचतगटासाठी कर्ज वाढवावे. यावेळी शेतक-यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान महाप्रबंधक राजेश कुमार सुरेंद्र शर्मा व श्रीनिवास गवळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन जामदार यांनी केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget