Breaking News

ठाण्यात मॉलमधील दुकानातून सौंदर्यप्रसाधने चोरीला


ठाणे : प्रतिनिधी

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील व्हीवियाना मॉलच्या स्टाॅलमधील तब्बल साडे 15 हजार रुपयांची सौंदर्यप्रसाधने अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.याप्रकरणी,वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

घोडबंदर रोडवरील व्हीवियाना मॉलच्या पहिल्या मजल्यावर कलरबार कॉस्मेटिक कंपनीचा स्टाॅल आहे.या स्टाॅलला असलेल्या पडद्याच्या मोकळ्या राहिलेल्या फटीतून अज्ञात चोरट्याने 15 हजार 450 रुपये किमतीची लिपस्टिक व नेलपेंट आदी सौंदर्यप्रसाधने चोरून नेली.रविवारी नेहमीप्रमाणेस्टाॅल उघडण्यासाठी आलेल्या महिला कर्मचारीला दुकानातील वस्तू गायब आढळल्याने चोरी झाल्याचे उघडकीस आले.दरम्यान,हा प्रकार शनिवारी रात्रीनंतर घडला असावा.असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून सीसी टीव्ही फुटेजद्वारे चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.