Breaking News

दुष्काळी तालुक्यात समावेशासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार-आमदार गावित

कळवण तालुक्यातील गावांची पाहणी
कळवण प्रतिनिधी-राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यामध्ये कळवण या आदिवासी तालुक्याचा शासनाने समावेश न केल्याने कळवण तालुक्यातील जनतेत नाराजी पसरली असून दुष्काळी यादीत कळवणचा समावेश करावा या मागणीचे निवेदन आमदार जे.पी.गावित हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत 

  आमदार जे.पी.गावित यांनी कळवण तालुक्यातील विविध गावात जाऊन पिकांची पाहणी केली असून पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे, तालुक्यात पावसाळा संपला तरी सरासरीच्या केवळ 50 टक्केपेक्षा कमी प्रमाण झाले असल्याने तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे बर्‍याच ठिकाणी बंधारे कोरडे असून पावसाच्या भरवशावर केलेला हंगामाचे पिक वाया गेले आहेत.
             
 कळवण महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष पिकाची पाहणी करून  आणेवारी करावी व कळवण तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार आहे,असे आमदार जे.पी.गावित यांनी दुष्काळी पाहणी दरम्यान सांगितले.यावेळी आमदार जे.पी.गावित यांच्यासह माजी पंचायत समिती सभापती काशिनाथ गायकवाड,माकप सेक्रटरी हेमंत पाटील,टिनू पगार,मोहन जाधव,बाळासाहेब गांगुर्डे,नाना देवरे,अजय  पगार आदींसह शेतकरी उपस्थित होते.