Breaking News

मलकापूरत पालिकेत भाजपची सत्ता येणार : डॉ अतुल भोसले


कराड (प्रतिनिधी) : आगामी काळात होऊ घातलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपची सत्ता येऊन नगराध्यक्षही भाजपचाच असेल, असे प्रतिपादन विठ्ठल-रूक्मीणी देवस्थानचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी नगराध्यक्ष सौ. रोहीणी शिंदे कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदिश जगताप यांची उपस्थिती होती.

ना. डॉ. भोसले म्हणाले, कराड शहराच्या विविध विकास कामासाठी राज्य शासनाकडे भरीव निधीची मागणी केली होती. शासनाने शहरातील छ. शिवाजी महाराज क्रिडा सुशोभीकरणासाठी 2 कोटी रूपये मंजूर केले आहेत. कराड शहरातील विविध प्रलंबीत कामासंदर्भाने राज्य शासनाकडे भरीव निधीची मागणी केली आहे. त्यापैकी शिवाजी स्टेडीयमचे नुतनीकरण व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. शहरातील कृष्णा तीरावरील भिंतीची तटबंदीचाही प्रश्न तडीस लावण्यात येणार आहे. शहरातील वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. यासाठी शहराच्या बाहेरून मार्ग काढण्याची गरज आहे. सध्या कोयना पूलाच्या नुतनीकरणाचे काम चालू आहे. मात्र त्यास गती व दर्जा नाही या कामी अधिकार्‍यांची आढावा बैठक घेऊन कामाबाबत सुचना देण्यात येतील, असेही ना. डॉ. भोसले यांनी सांगितले.