Breaking News

‘चायना-इंडिया फोरम’ परिषद यंदा पुण्यात


पुणे : सातव्या ’’चायना-इंडिया फोरम’’ या परिषदेचे यंदा पुण्यात आयोजन करण्यात येणार आहे. ही परिषद येत्या 27 ऑक्टोबरला पुण्यातील हयात रिजन्सी या ठिकाणी पार पडणार आहे.याच्या उद्घाटनाला केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चीनचे भारतातील राजदूत लुओ झाहुई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

चीनने भारतात गुंतवणूक करावी तसेच दोन्ही देशांत तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान व्हावे या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पोदार एंटरप्राइजेस आदी संस्था मिळून याचे आयोजन करत आहेत. यात भारत आणि चीनचे सुमारे 400 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.