Breaking News

बीडचे सैराट जोडपे पुण्यात सापडले


बीड, (प्रतिनिधी):- बीडमधून पलायन केलेल्या अल्पवयीन मुलीसह २२ वर्षीय मुलाला पुण्यात ताब्यात घेण्यात आले. १९ ऑक्टोबर रोजी त्यांनी पलायन केले होते.गणेश रमेश हिवराळे (२२ रा.पंचशीलनगर बीड) असे पळवून नेलेल्या मुलाचे नाव आहे. 

गणेशचा यापूर्वी विवाह झालेल्या असून त्यास एक मुलगीही आहे. पीडित अल्पवयीन मुलीचा भाऊ गणेशचा मित्र आहे. यामुळे त्याचे घरी येणे-जाणे असे. यातूनच त्यांची ओळख झाली. पीडिता ही बीड शहरातील धानोरा रोडवरील एका शाळेत ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शाळेत जाताना त्यांची रोज भेट होत असे. १९ तारखेला त्यांनी दुचाकीवरून पलायन केले. त्यानंतर पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक बी.एस.ढगारे यांनी तात्काळ पुण्याला धाव घेत आपले कौशल्य वापरून या जोडप्याला सोमवारी दुपारी एका बागेतून ताब्यात घेतले. ढगारे व कर्मचारी ए.एम.भगर हे या जोडप्याला घेऊन बीडला रवाना झाले होते.