Breaking News

शहरी व ग्रामीण भागातील भारनियमन बंद करा-राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी


अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई तालुका, परिसरात व ग्रामिण भागात गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे अघोषित भारनियमन सुरू करण्यात आलेले आहे. सध्या महाराष्ट्र शासन दुष्काळ जाहीर करण्याच्या परिस्थितीत असताना भारनियमन चालू करणे म्हणजे शेतकरी व सामान्य जनतेला वेठीस धरण्यासारखे आहे. यावर्षी पाऊस खूपच कमी झाल्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती ही खूप वाईट आहे.शेतकरी मानसिकदृष्ट्या खचला आहे.ज्या शेतकर्‍यांकडे स्वतःचे थोडेफार पाणी आहे.तो शेतकरी भारनियमनामुळे शेतीला पाणी देऊ शकत नाही.तसेच शेतीची इतर कामे करणेही खुप अवघड झालेले आहे.

अशा परस्थितीत शेतकर्‍यांसमोर कोणतीही पर्याय नाही.तसेच सध्या सणासुदीचे दिवस आहेक.अंबाजोगाईचे कुलदैवत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव सुरू आहे.सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे भाविक भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी व सामान्य जनतेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अंबाजोगाई तालुका परिसरातील भारनियमन तात्काळ बंद करावे अन्यथा या प्रश्नी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यामागणीचे निवेदन अंबाजोगाई येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने माजी आमदार पृथ्वीराज साठे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजित लोमटे,युवा नेते दत्ता सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अंबाजोगाई शहराध्यक्ष हमीद अब्दुल रहेमान चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दि.१२ ऑक्टोबर रोजी देण्यात आले.या निवेदनावर माजी आमदार पृथ्वीराज साठे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजित लोमटे,आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.