Breaking News

मुंबईत किरकोळ वादातून मॉडेलची हत्या


मुंबई : मालाडच्या माइन्डस्पेस कार्यालयाजवळ एका तरुणीचा मृतदेह असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली होती. मानसी दीक्षित असे या मृत तरुणीचे नाव असून ती मॉडेल होती. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. तिची हत्या किरकोळ वादातून झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत तरुणी ही मॉडेल म्हणून काम करीत होती तसेच ती एका इव्हेन्ट कंपनीत भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. मालाड परिसरातील माईंडस्पेस या परिसरातील झुडपात सोमवारी एका बॅगमध्ये तिचा मृतदेह आढळुन आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीला पोलीसांनी अवघ्या काही तासातच अटक केली असून, मुजमिल इब्राहिम असे या आरोपीचे नाव आहे. मृत मानसी काही कामास्तव आरोपीच्या घरी गेली असता, तिच्यात व आरोपीमध्ये काही कारणावरून किरकोळ वाद झाल्याने त्याने मानसीची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एका बॅगमध्ये तिचा मृतदेह भरून एका झुडपात आणून टाकण्याचा प्रयत्न करीत असताना,काही लोकांनी त्याला पाहिले. याबद्द्ल पोलिसांना माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.