सबरीमाला मंदिरात येणार्‍या महिलांचे तुकडे करा; अभिनेता कोल्लम तुलसीचे वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली : अभिनेता कोल्लम तुलसी यांना सबरीमाला मंदिराप्रकरणी केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोल्लम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सबरीमाला मंदिरप्रवेशाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी बोलताना कोल्लम यांनी हे वक्तव्य केले होते.

सबरीमाला मंदिरात येणार्‍या महिलांचे 2 तुकडे करायला हवे. त्यातील 1 भाग दिल्लीला पाठवा, तर दुसरा भाग मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर फेकून द्या, असे वक्तव्य कोल्लम यांनी केले होते.
शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध तिरुवनंतपुरम येथे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व नायर सर्व्हिस सोसायटीने (एनएसएस) केले होते. तसेच, राष्ट्रीय अयप्पा डेव्होटी असोसिएशन’ने न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या याच निर्णयाविरोधात चक्क महिलांनीच रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यामुळेही आश्‍चर्य व्यक्त होत होते. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती. मात्र, सबरीमाला मंदिरातील पुजारी आणि संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला. शबरीमला मंदिर प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केरळ राज्य सरकार दाद मागणार नाही, असे मुख्यमंत्री विजयन यांनी दिली. न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिरात जाऊ इच्छिणार्‍या महिलांना कोणीही रोखू शकत नाही. ज्या महिलांना मंदिरात प्रवेश करायचा आहे त्यांना आवश्यक सुविधा व सुरक्षा पुरवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शबरीमला मंदिरातील महिलांवरील प्रवेशाची बंदी उठविण्याच्या निर्णयाविरोधात केरळात शिवसेनेने 1 ऑक्टोबरला 12 तासांचा बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता. आता तर महिलांना स्वातंत्र्य देणाऱया पुरोगामी निर्णयाविरोधात महिलांनाच आत्महत्या करायला लावण्याचा घाट घातला जात आहे. खरे तर हा निर्णय पुरुषप्रधान संस्कृतीच्या विरोधात जाणारा असल्याने अशा विचारसरणीच्या पुरुषांचा विरोध अपेक्षित होताच. मात्र, यासाठीही पुरुषप्रधान संस्कृतीच्या पाईकांकडून शस्त्र म्हणून महिलांचाच वापर केला जात आहे. तसेच, महिलाही यात स्वतःहून सहभागी होत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे.


चौकट....
अन्यथा शिवसेना कार्यकर्त्या करणार आत्महत्या
केरळ येथील शिवसेना शाखेचे नेते पेरिंगाम्माला अजी यांनी शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून नवीन वादाला तोंड फोडले आहे. येत्या 17 व 18 ऑक्टोबरला आमच्या महिला कार्यकर्त्या पंबा नदीजवळ थांबतील आणि एका जरी तरुण महिलेने मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला, तर त्या सर्व आत्महत्या आंदोलन करतील. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश रोखण्यासाठी आपल्याच महिला कार्यकर्त्यांना आत्महत्या करायला लावण्याचे वादग्रस्त विधान पेरिंगाम्माला यांनी केले आहे.

शबरीमला मंदिराला भेट देणार : तृप्ती देसाई


सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 28 सप्टेंबरला शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकापासून असलेली बंदी उठवली. मात्र न्यायालयाच्या या निर्णयाला अनेक स्तरावरुन तीव्र विरोध करण्यात येत आहे. मात्र, आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी अय्यप्पा मंदिराला भेट देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget