भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचे परळीत प्रशिक्षण शिबीर


परळी,(प्रतिनिधी) :पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानातर्ंगत सोमवारी म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे तसेच विभाग संघटनमंत्री व भाजपचे पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.एन. एच. अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी सकाळी १० वा. होणा-या या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे तसेच भाजपाचे संघटनमंत्री भाऊराव देशमुख, जिल्हयाचे प्रभारी गोविंदराव केंद्रे, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, प्रशिक्षण अभियानाचे मराठवाडा प्रमुख राम कुलकर्णी, जिल्ह्याचे प्रमुख देविदास नागरगोजे, विधानसभा विस्तारक सुभाष धस आदींच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत चालणा-या या प्रशिक्षण शिबीरात एकूण पांच सत्र होणार असून बुथ कार्यकर्त्यांना केंद्र व राज्य सरकारची उपलब्धी, बुथ रचना व निवडणूक व्यवस्थापन, भाजपाचा इतिहास व जडणघडण, सध्याची राजकीय परिस्थिती आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परळी मतदारसंघातील बुथ समित्यांचा आढावा देखील यावेळी घेतला जाणार आहे. शिबीरात भाजपाचे सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, राज्य व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी आदींनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नेताजी देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget