Breaking News

चांदा जि. प. शाळेत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात


चांदा प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील चांदा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परशुराम सेवा संघ व डॉ. नाईक सर्जरी, अ. नगर यांच्या सयुंक्त विद्यमाने मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये एकूण २८२ शालेय विद्यार्थी आणि व विद्यार्थिनींचे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिर तपासणीत डॉ. योगेश तिवारी, नारायण उगले, सागर शिंदे, आरोग्यसेविका काजल सिंगाडे, जनआरोग्य योजनेचे महेश लवांडे, प्रशांत शेळके यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. राजेंद्र जोशी, जिल्हा उपाध्यक्ष गणेश जोशी, विष्णुपंत भालेराव, संजय मुळे, संतोष भंडारी, मुख्याध्यापीका श्रीमती आरसाबाई गारुडकर, भास्कर मरकड, राहुल जाधव, श्रीमती शांता मरकड, स्वाती नन्नवरे, सुजाता किंबहुणे, अनिता जाधव, मंगल पिंपळे, शितल शिंदे, इमरान खान या शिक्षकांनी शिबिर तपासणीसाठी सहकार्य केले. सोमनाथ धुमाळ, अण्णासाहेब दहातोंडे, सुभाष शेंडे, नाथा दहातोंडे आदी उपस्थित होते.