Breaking News

आदिवासी महिलांची बदनामी केल्याप्रकणी कारवाई करा-गायकवाड


गेवराई (प्रतिनिधी)- आदिवासी क्रांती दलाचे बीड जिल्हाध्यक्ष राधा किसान गायकवाड यांनी दिनकर मनवर यांनी मुंबई विद्यापीठात टी.वाय बी.ए.अभ्यास कर्मात आदिवासी स्त्रिया बाबत असभय कविता लिहून एक प्रकारे आदिवासी समाजाची विटंबना केली आहे. यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी याबद्दल गेवराई पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले जर या व्यक्तीवर कारवाई न केल्यास एकलव्य आदिवासी क्रांतीदल संघटनेच्यावतीने बीड जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असाही इशारा एकलव्य आदिवासी समाजा चे बीड जिल्हा अध्यक्ष राधा किसन गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.