Breaking News

शेतात काम करणार्‍या महिलेवर अत्याचार; अंबाजोगाई तालुक्यातील घटना


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- सकाळच्या वेळी शेतात काम करत असलेल्या २५ वर्षीय महिलेवर गावातीलच एकाने अत्याचार केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथे उघडकीस आली आहे याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की दोन महिन्यापूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. त्यावेळेस पासून ती साकुड येथे वडिलांकडे राहत आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता ती वडिलांच्या शेतात ज्वारी काढण्याचे काम करत होती. यावेळी साकुड येथेच राहणारा अखिल शब्बीर शेख हा तिथे आला आणि मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे म्हणून संबंध ठेवण्याची जबरदस्ती करू लागला. यासाठी पीडितेने नकार देतात आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून अखीलने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. घाबरलेल्या पीडितेने झालेल्या घटनेची माहिती कोणालाच दिली नाही. मात्र शनिवारी तिने वडिलांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर वडिलांसोबत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तिने अत्याचार झाल्याची तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून अखिल शब्बीर शेख याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३७६ अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पीएसआय श्रीनिवास भिकाने हे करत असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.