Breaking News

कोहलीचं अर्धशतक हुकलं, चहापानापर्यंत भारताच्या ४ बाद १७३ धावा


चांगला जम बसल्यानंतर कर्णधार विराट कोहली ४५ धावा करुन बाद झाला. चहापानाची वेळ झाली तेव्हा भारताने आपल्या पहिल्या डावात ४ विकेट्स गमावून १७३ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेसोबत त्याची भागीदारी वेग पकडत असतानाच वेस्ट विंडीजचा कर्णधार जेसेन होल्डरने कोहलीला बाद केले. अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत सध्या मैदानावर जम बसवण्याच्या प्रयत्नात आहेत. चांगली भागीदारी करुन भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्याचं आव्हान या जोडीसमोर आहे.