Breaking News

कळवणला शिवसेनेचा सरकारविरोधात धडक निषेध मोर्चा... मोर्चात मोटारसायकलची प्रेतयात्रा,बैलगाड्याही जुंपल्या...


राकेश हिरे
कळवण प्रतिनिधी-'वाह रे सरकार तेरा खेल-सस्ती दारु महंगा तेल' अशा घोषणा देत वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सरकारच्या निषेधार्थ कळवण ताालुका शिवसेनेच्या वतीने भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी सरकारविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.
पेट्रोल डिझेलसह गँस व इंधनाचे दररोज वाढत असलेले भाव,वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाल्याचा आरोप करत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख अंबादास जाधव व शहरप्रमुख साहेबराव पगार यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहरातुन धडक निषेध मोर्चा काढण्यात आला.नवीन कोर्टापासुन मोर्चा ला सुरुवात झाली.या मोर्चाच्या अग्रभागी मोटारसायकल व गँस सिलेंडर ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.पेट्रोल दरवाढीचा निषेध म्हणुन बैलगाड्याही या मोर्चात आणण्यात आल्या होत्या.यावेळी शिवसैनिकांनी 'गाडी बंद पेट्रोल बिन -इसको कहते अच्छे दिन,'
'मोदीजींच मोठ काम -वाहनधारकांना सुटला घाम,' अशी घोषणाबाजी केली.

मोटारसायकल ढकलुन चालवत सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. बसस्थानक परिसरात हा मोर्चा आल्यानंतर रस्त्यावर शिवसैनिकांनी ठिय्या देत शासनाचा निषेध केला.यावेळी लोकसभा समन्वयक कारभारी आहेर यांनी मनोगत व्यक्त करुन सरकार सर्वसामान्यांना हवालदिल करत असल्याचा आरोप केला. तहसीलदार कैलास चावडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मोर्चात दिंडोरी लोकसभा समन्वयक कारभारी आहेर,तालुकाप्रमुख अंबादास जाधव,शहरप्रमुख साहेबराव पगार,विधानसभा सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार,विधानसभा संघटक दशरथ बच्छाव,उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ,मोतीराम पगार,विभागप्रमुख शितलकुमार आहिरे,उपशहरप्रमुख विनोद मालपुरे,अजय पगार,ग्राहक कक्ष कार्यालय जिल्हाप्रमुख संजय रौदळ,ग्राहक कक्ष शहरप्रमुख किशोर पवार,महिला संघटक प्रीती मेणे,उपतालुका प्रमुख विनोद भालेराव,युवासेना उपजिल्हाधिकारी नवनाथ बेनके,युवासेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे,शहरप्रमुख सुनील पगार,
डॉ.दिनेश बागुल,विजय जाधव, राजु वाघ,वसंत देसाई, ,डॉ पंकज मेणे, चिंतामण निकम,दिपक गायकवाड, प्रकाश भालेराव, प्रवीण जाधव,जयवंत मोरे,रंगनाथ गावित,न्यानेश्वर जगताप, भालचंद्र गांगुर्डे, चंद्रकांत बुटे, राजु शिंदे,मोती निकम, अशोक हरदे, तेजस जाधव,प्रवीण पगार,ऋषीकेष खैरनार, सचिन पगार,विद्यार्थी सेनेचे निखिल बोरसे, प्रतीक पवार,भय्या पवार,मयुर बोरसे,हरिष हिरे,भैय्या वाघ,व्यापारी सेना प्रमुख आनंद नागमोती, बैलगाडी शेतकरी अशोक पवार,नंदकुमार पवार,आबा पवार, वसंत पवार,सुभाष पवार, संजय बच्छाव, विजय भोये, पप्पु धनवटे, सोमनाथ खैरनार,युवराज गांगुर्डे, संतोष पवार,गोकुळ बोरसे,आबा निकम,बाबा आहिरे आदींसह कळवण तालुका व शहर शिवसेना,युवा सेना,विद्यार्थी सेना,महिला आघाडी,ग्राहक संरक्षण कक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्चाने वेधले लक्ष-
मोटारसायकल आणि गँस सिलेंडरची प्रेतयात्रा,एकामागोमाग एक बैलगाड्या,वाहनधारक लोटत घेवुन चालत असलेल्या मोटारसायकली यामुळे कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाने कळवणकरांचे लक्ष वेधुन घेतले.